Friday, June 20, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही – शरद पवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 17, 2023
in maharashtra
0
अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही – शरद पवार
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही. २०२४ मध्ये देशातील चित्र बदलण्यासाठी आम्ही कष्ट करणार आहोत. भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून भाजपा आणि मोदी सरकार विरोधात बिहार आणि कर्नाटक या दोन राज्यांत देशपातळीवर दोन सभा घेण्यात येतील. याबाबत 1 सप्टेंबरच्या सभेत पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, गेल्या आठ-दहा दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात सुमारे 1000 लोकांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली. पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडच्या दौऱ्यावर आहे. मी जिल्ह्यात जावो ना जावो लोकं मला साथ देतात हा माझा अनुभव आहे. आम्ही मविआ म्हणून एकत्रित लोकांसमोर जाणार आहोत. महाराष्ट्रातल्या तरुणांनी कोणत्या रस्त्याने जायचे ते ठरवले आहे. त्याचा निकाल २०२४ च्या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे

पवार म्हणाले की, भाजपाला लोकांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. धर्म आणि समुदायाच्या आधारावर त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सरकार अस्थिर केले आहे. आमच्याकडे अनेक उदाहरण आहेत. केंद्राच्या सत्तेचे गैरवापर करून निवडून आलेली सरकार पाडणे, मध्यप्रदेश कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. सत्तेचा वापर करून महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं पाडलं हे सर्वांना माहित आहे. भाजपकडून केंद्रातील सरकारचा गैरवापर करून अनेक राज्यात ईडीच्या धाक दाखवून सरकार पाडण्यात येत आहे असे देखील शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे. मला एका राजकीय नेत्याने म्हटले आहे की राज्यात नेत्यांपेक्षा ईडी जास्त निर्णय घेते असेही सांगितले आहे.

देशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जातीय तेढ निर्माण केले जात आहे. दुसरीकडे मणिपूर जळतंय तरी त्यावर बोलायला राज्यकर्ते तयार नाहीत. काल स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी तर देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असे वाटत होते. ते म्हणाले की मी पुन्हा येईल. ज्या प्रमाणे फडणवीस पुन्हा आले पण खालच्या पदावर. तसेच मोदी देखील येत्या काळात कसे येतील? असे सध्या मला सांगता येणार नाही असेही पवार यांनी म्हटले आहे.

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत आहे. दोन दिवसांपूर्वी सांगोला या ठिकाणी गेलो तेव्हा मला लोकांनी थांबवले सहमतीची भूमिका दाखवली. बारामती, कोल्हापूर, सातारा आणि काल मी औरंगाबादला आलो. काल ना. धो. महानोर यांच्या श्रद्धांजली सभेला हजर राहिलो. तर त्यांच्या महानोरांच्या गावी गेलो होतो. दुसरे एक सहकारी इंजिनिअरींग क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. प्रताप बोराडे यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार आहे.

आज देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहेत. त्या भाजपची भूमिका देशातील सर्वसमाजात एकवाक्यता ठेवण्यासाठी अपेक्षित होते. त्याऐवजी ते देशात कटुता कशी वाढेल यासाठी भूमिका घेत आहेत. त्यासाठी आम्ही देशपातळीवर सभा घेतल्या. एक बिहार आणि दुसरी कर्नाटक येथे सभा झाल्या. संयुक्त सभा घेऊन त्याला इंडिया नाव दिले. 31 ऑगस्ट रोजी इंडियाची आघाडीची बैठक होईल. या बैठकीत सामूहिकपणे मोदी सरकारविरोधात लढाई सुरू होईल. समाजामध्ये जातीय तेढ कसे निर्माण होईल असे निर्णय घेतले जात आहेत.

मणिपूरमध्ये काय घडलं ही भूमिका आम्ही संसदेत मांडली. आज नॉर्थ ईस्ट हा सर्व भाग देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. चीनची सीमा असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नॉर्थ ईस्ट घडतात किंवा घडवल्या जातात त्या देशाच्या एक्याच्या दिशेने घातक आहेत. मणिपूरमध्ये दोन समाजात अंतर वाढले की समाज एकमेकांविरूद्ध संघर्ष चालू आहे. पोलिंसावर हल्ले केले जात आहेत. त्यावर केवळ सुरुवातीला तीन मिनीट मोदी बोलले. आणि संसदेत केवळ दहा मिनिटं बोलून हा विषय बाजूला केला. हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. मणिपूरमध्ये स्त्रीयांच्या अब्रुची धिंड काढल्या जातात. याकडे मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळे इंडियाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ.

महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटाचा प्लँन सुरू आहे, याची चर्चा असु शकते, परंतु ती वस्तुस्थिती नाही. माझी आताही तीच भुमिका आहे. असं म्हणत शरद पवारांनी आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहे. येवल्यानंतर शरद पवारांची बीडमध्ये १७ आँगस्ट रोजी सभा होत आहे. त्यानंतर २७ आँगस्ट रोजी अजित पवार उत्तर सभा घेणार आहेत. त्यावर आपल्या देशात लोकशाही आहे. कोणालाही सभा घेण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी सध्याची भुमिका का घेतली आहे. ते त्यांनी जनतेला सांगावं असंही शरद पवारा साहेबांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे की कोणत्या दिशेने जावं. त्याचा निकाल आगामी काळातील निवडणुकांमधून दिसून येईल. काही जिल्ह्यात मी जावो अथवा न जावो. लोक मला साथ देतातच. असंही पवारांनी यावेळी सांगितले आहे. सध्या जे काही भाजपचं राज्यात सुरू आहे. त्यावर लोक सत्ताधाऱ्यांना उत्तर देतील असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

माझ्या आयुष्यात मी १४ निवडणूका लढलो आहे. मला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. चिन्हापेक्षा आम्ही प्रामाणिक काम केलं म्हणून हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही पण सत्तेचा गैरवापर करु नये असं माझं मत आहे. सध्या निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेत नाही. निवडणूक आयोगाने जर स्वत: निर्णय दिला तर मला चिंता नाही. शिवसेनेबाबतच्या निर्णयावर केंद्राने हस्तक्षेप केला होता. त्यामुळे आयोगात ठाकरेंसोबत जे झालं ते आमच्यासोबत देखील होऊ शकतं असेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच सत्तेचा गैरवापर आज होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकात नाही. आंध्र प्रदेशात भाजपा नाही. तेलंगणात नाही. महाराष्ट्रात भाजपा सरकार कसे आले हे सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले. राजस्थानात, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नाही. मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous Post

हिमाचल आणि उत्तराखंडला हवामान विभागाचा ‘रेड-अलर्ट’

Next Post

‘पिल्लू बॅचलर’ दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘पिल्लू बॅचलर’ दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला !

'पिल्लू बॅचलर' दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group