केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिक येथील बंगल्याच्या आवारात चौघांनी आरडाओरडा करून सुरक्षारक्षक पोलीस तसेच मंत्री पवार यांच्या सचिवांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून आंदोलन करण्याची धमकी दिल्याबद्दल गंगापूर पोलीस ठाण्यात एका वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार ॲड. अल्का शेळवके (मोरे पाटील) व एक महिला व दोन पुरुष (नाव गाव पत्ता माहीत नाही) अशा चौघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.