उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग येथे मुसळधार पावसात अडकलेल्या भाविकांची हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आलीय. विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचे लँडिंग व्हावे यासाठी 7 महिलांनी परिश्रम घेऊन अल्पावधीत तात्पुरते हेलिपॅड निर्माण केले.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. दोन्ही राज्यांमध्ये या कालावधीत पावसामुळे भूस्खलन आणि ढगांशी संबंधित घटनांमध्ये 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्यमहेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले 20-25 भाविक मंगळवारी पावसामुळे अडकून पडले होते. प्रत्यक्षात मध्यमहेश्वर धाम आणि महामार्गादरम्यान एक पूल होता तो कोसळल्यामुळे संपर्क तुटला होता. प्रशासनाने हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू केले, मात्र धाममध्ये उतरण्याची जागा नव्हती. त्यानंतर 7 हून अधिक स्थानिक महिला पुढे आल्या आणि त्यांनी काही तासांत हेलिपॅड तयार केले. त्यानंतरच अडकलेल्यांची सुटका करता आली. सोशल मिडीयात या महिलांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होतेय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...