हरियाणाच्या कुरूक्षेत्र येथील टिकरी गावानजीक झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. अपघाताला बळी पडलेले सर्वजण सालपाणी गावातील गुरुद्वाराचे सेवक असल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीत आठ जण होते. त्यापैकी उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, मंगळवारी रात्री 9 वाजता आठ सेवक एका कारमधून पेहोवा येथून राष्ट्रीय महामार्ग 152 डी वर गुरुद्वाराच्या दिशेने जात होते. यावेळी टिकरी गावाजवळ त्यांच्या गाडीसमोर अचानक एक प्राणी दिसला. त्यामुळे त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजक ओलांडून पलीकडे घुसली. येथे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या स्कॉर्पिओला कारची धडक बसली. या काळात अनेकवेळा वाहन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 5 सेवकांचा मृत्यू झाला. तिघे रुग्णालयात दाखल आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बाबा वीरेंद्र सिंग, बाबा मनदीप सिंग, बाबा गुरवेझ सिंग, बाबा हरमन सिंग आणि बाबा हरविंदर सिंग यांचा समावेश आहे.