कोरोना साथरोगाच्या काळात रद्द झालेल्या विमान तिकीटांचा लवकरच परतावा (रिफंड) मिळणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाची ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने ट्रॅव्हल पोर्टला रद्द तिकीटांच्या परताव्याबाबत नोटीस जारी केलाय.
देशात कोरोना साथरोगामुळे 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन लावण्यात आले होते. याकाळात अनेक विमान उड्डाणे रद्द झाली होती. तर काही प्रवाशांनी काही कारणांमुळे तिकीटे रद्द केलीत अशा ग्राहकांना तिकीटाची रक्कम परत मिळाली नव्हती. तेव्हापासून त्यांचे पैसे अडकून बसले होते. आता अशा प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नुकतीच ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्ससोबत एक बैठक घेतली आहे. सरकारने ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्सना पुढील आठवड्यापर्यंत प्रवाशांना त्यांच्या कोविड काळातील रद्द झालेल्या फ्लाइट तिकिटांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सरकारने यासंदर्भात नोटीसही जारी केलाय. त्यामुळे प्रवाशांना लवकरच त्यांच्या रद्द तिकीटांच्या रकमेचा परतावा मिळणार आहे.