आर्थिक वर्ष 2023-24 साठी 9 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण प्रत्यक्ष कर संकलन रु. 11.07 लाख कोटी झाले असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण संकलनापेक्षा 17.95% अधिक आहे. 1 एप्रिल ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 1.50 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. या तात्पुरत्या आकडेवारीने स्थिर वाढ नोंदवली आहे.
प्रत्यक्ष कर संकलन निव्वळ परतावा 9.57 लाख कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत निव्वळ संकलनापेक्षा 21.82% अधिक आहे. हे संकलन आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण अनुमानित अंदाजपत्रकाच्या 52.50% आहे.
एकूण महसूल संकलनाच्या बाबतीत ,कॉर्पोरेट प्राप्तिकर (सीआयटी ) आणि वैयक्तिक प्राप्तिकराच्या (पीआयटी ) वृद्धी दराच्या दृष्टीने , कॉर्पोरेट प्राप्तिकरासाठी वृद्धी दर 7.30% आहे तर वैयक्तिक प्राप्तिकरासाठी 29.53% (केवळ पीआयटी ) 29.08 % (एसटीटी सह पीआयटी ) आहे.
परताव्याच्या समायोजनानंतर, कॉर्पोरेट प्राप्तिकर संकलनातील निव्वळ वाढ 12.39% आणि वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात 32.51% (केवळ पीआयटी ) 31.85% (एसटीटी सह पीआयटी) आहे.