छत्तीसगड विधानसभेच्या 20 जागांवर आज, मंगळवारी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. यामध्ये 10 जगांवर सकाळी 7 ते दुपारी 3 आणि उर्वरित 10 जगांवर सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत मदतान झाले. यादरम्यान सुकमा येथील तोडामरका येथे नक्षल्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी झाला.
छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या 20 जागांपैकी 17 जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तर 2 जागा भाजपकडे होत्या. यात 2018 च्या निवडणुकीत दंतेवाडाची जागा भाजपकडे होती, मात्र नक्षलवादी हल्ल्यात आमदाराच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसकडे गेली. तसेच खैरागडची जागा जेसीसीजेकडे होती, पण तीही पोटनिवडणुकीत काँग्रेसने काबीज केली. कावर्धा आणि मोहला मानपूर या जागांवर अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.