जागतिक परिस्थिती प्रतिकूल असूनही जुलै 2023 मध्ये भारताच्या एकूण निर्यात अंदाजे 59.43 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंतचा टप्पा गाठला आहे. या संदर्भात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने माहिती जाहीर केली आहे.
देशाची एकूण व्यापार तूट जुलै 2022 मधील 15.24 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 45.22 टक्क्याने सुधारून जुलै 2023 मध्ये 8.35 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे. मालाची व्यापार तूट जुलै 2022 मधील 25.44 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 18.74 टक्क्याने सुधारून जुलै 2023 मध्ये 20.67 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये लोह खनिजाच्या निर्यातीत 962.82 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली. एप्रिल-जुलै 2022 च्या तुलनेत यात एप्रिल-जुलै 2023 दरम्यान 64.52 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत जुलै 2023 आणि एप्रिल-जुलै 2023 मध्ये अनुक्रमे 13.09 टक्के आणि 37.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सिरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तूंच्या निर्यातीत जुलै 2023 आणि एप्रिल-जुलै 2023 मध्ये अनुक्रमे 20.82 टक्के आणि 12.39 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
कृषी निर्यातीत दमदार वाढ झाली आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये फळे आणि भाज्यांची निर्यात 18.94 टक्के, तेल बियाणे 32.83 टक्के, खाद्यतेल 34.24 टक्के, तांदूळ निर्यात 5.38 टक्क्याने वाढली आहे.