शनिवार, दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या पूर्व संध्येला, MPFS दुबई म्हणजेच महाराष्ट्र मंडळ, दुबई येथे सुवर्णपर्व दिवाळी सण साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके. श्री आदेश बांदेकर उर्फ आदेश भाऊजी यांच भारताप्रमाणेच दुबईत औक्षण करण्यात आले.ढोल ताशांच्या गजरात, भव्य जल्लोषात स्वागत…
2023 हे MPFS, दुबई चे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने श्री. आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडियेला “हा कार्यक्रम इथे सादर झाला आणि पन्नासाव वर्ष आणि पन्नास पैठ्ण्या जिंकायची संधी मिळाली दुबईतील माऊलींना .दिवाळीच्या पूर्वसंधेला मंडळाच्या ५० व्या सुवर्णपर्व वर्षानिमित्त ५० पैठण्यांसाठी रंगला खेळ आणि ५० जणींनी जिंकल्या पैठण्या … अध्यक्ष देवेंद्र लवाटे यांनी स्वागत केले