सोयगाव,दि.३ नोव्हेंबर
पंचायत समिती कार्यालय सोयगाव येथे दि.३ गुरुवार रोजी तालुका विधि सेवा प्राधिकरण सोयगाव यांचे वतीने कायदेविषयक मार्गदर्शन पर शिबीर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश अमोल इंगोले सर यांनी Senior Citizen या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमच्या प्रमुख पाहुणे म्हणुन सोयगाव वकील बारचे ॲड.योगेश जावळे,ॲड सचिन गिरी,उपस्थित होते.
शिबिरात पंचायत समितीचे सुनील मोरे,प्रशासकीय अधिकारी आनंद पैठणे,शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर.आढाव,तसेच न्यायालयीन कर्मचारी मंगेश देशमुख,शिवाजी गुरव,नीलेश ताडे,श्रीमती कल्पना दुसाने, आनंद चौधरी इत्यादी उपस्थित होते.तसेच सोयगाव येथील नागरिक उपस्थित होते.
ufk3wo