14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता आपल्या लाखो अनुयायांच्या साक्षीने मोठी धम्म्म क्रांती घडवली. बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात एक अभूतपूर्ण क्रांती या दिवशी झाली होती. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी दरवर्षी देशभरातून बौद्ध अनुयायांचा जनसागर दीक्षाभूमीवर उसळत असतो. नागपूरात यंदा देखील बौद्ध अनुयायांची मोठी गर्दी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी जमली.
शांती आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माकडे लोकांचा कल वाढत आहे. परिणामी दरवर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांच्या संख्येत यंदा देखील वाढ झाली आहे. यंदा 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. यंदा केरळ व कर्नाटक राज्यातून हजारोंच्या संख्येने लोक नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे.
तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेषता जपानहून आलेले 15 हजार उपासक उपासिकांनी श्रामणेरची दीक्षा घेतली. जापान वरून आलेल्या या अनुयायांनी अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर त्रिशरणसह दशशील ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी परत जाताना ज्ञानरूपी पुस्तकांची शिदोरी घेऊन घरी जावे या उद्देशाने दीक्षाभूमीवर लावण्यात आलेल्या शेकडो पुस्तकांच्या स्टॉलवर मोठी गर्दी केली आहे.