राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल साहित्यिक नामदेव जाधव यांनी खालच्या पातळीत टीका केल्याने सोलापूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नामदेव जाधव आणि गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टर ला जोडे मार आंदोलन करून पोस्टर जाळण्यात आले. दोन दिवसांपूर्वी साहित्यिक नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचयावर टीका केली होती याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत, त्या बरोबर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे देखील वारंवार शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत याचा निषेध म्हणून सोलापूरात देखील चार हुतात्मा चौक येथे नामदेव जाधव आणि पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून पोस्टर जाळण्यात आले.
नामदेव जाधव आणि गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल टीका करू नये अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी दिला. यावेळी गफूर शेख, जावेद शिकलगर, वैभव विभूते, सादिक मुजावर, गौस कुरेशी, रजनीकांत ठेंगील, संजय गायकवाड, परवेज शेख, सिद्ध निशानदर, आदित्य वाकसे, गिरीश म्हमाणे, अप्पा कोकाटे, रवी सोलंकर, जाकीर शेख प्रसाद भास्कर यांच्यसह कार्यकर्ते उपस्थित होते.