नांदगाव तालुक्यातील नागासाग्या धरणालगत अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल गोल्डन पॅलेस याठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस आणि नांदगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत देहविक्री रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मोहम्मद अख्तर शमीम सोनावाला, मॅनेजर सचिन इंगळे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप जाधव, वाल्मिक माळी, संजय मेंगनर आणि देहविक्री करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि नांदगाव पोलिसांनी नागासाग्या धरणालगत असलेल्या हॉटेल गोल्डन पॅलेस येथे बनावट ग्राहकास पाठवले होते. त्यावेळी त्याच्याकडून पैसे स्वीकारुन पीडित महिला अन्य साथीदार पथकाच्या जाळ्यात अडकले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम रुपये 5 हजार 70 रुपये, 43 हजार रुपये किमतींचे मोबाईल, कामोत्तेजक, स्प्रे, महागडे गर्भनिरोधक असा मुद्देमाल जप्त केला आहे.