महाराष्ट्राला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळाली आहे.तुकाराम महाराजांनी त्याकाळी वृक्षाचे महत्व समाजाला आपल्या विचारातून पटवून दिले.धार्मिकतेतून समाजाला दिशा मिळत असते. मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या कुटुंबियांच्या वतीने कीर्तनाच्या माध्यमातून वृक्षरोपण संवर्धनाची लोकचळवळ हाती घेऊन पर्यावरण संतुलनासाठी आपले कर्तव्य बजावले जात आहे.सध्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस ऋतुमानात बदल होताना दिसत आहे.त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.संत साहित्याच्या माध्यमातून समाज एकत्र येवून चांगल्या विचाराची देवाणघेवाण होत असते,असे प्रति पादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
मदनगर शहरात सावेडी भिस्तबाग महल येथे कै विजय बारस्कर यांच्या पुण्यस्मरणार्थ हभप वाणीभूषण समाधान शर्मा महाराज यांचे हरिकीर्तन संपन्न झाले.यावेळी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते.या प्रसंगी उप महापौर गणेश भोसले,हभप संदीप महाराज खोसे यांच्यासह भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हभप वाणीभूषण समाधान शर्मा महाराज म्हणाले की,धार्मिकतेतून समाज जोडला जातो.मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या कुटुंबियांच्या वतीने धार्मिकतेतून वृक्षारोपण संवर्धनाची लोकचळवळ हाती घेण्यात आली हे कौतुकास्पद कार्य आहे,असे हभप वाणीभूषण समाधान शर्मा महाराज यांनी सांगितले.