करमाळा-आवाटी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात देवीचामाळ परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याला अद्याप एक महिनाही पूर्ण झालेला नसताना सदरची डागडुजी करण्याची वेळ येत असेल तर रस्त्याचा दर्जा कसा आहे, हे लक्षात येते. देवीचामाळ परिसरात रस्ता तयार करण्यात आला. मात्र अतिशय घाईगडबडीत सदरचा रस्ता तयार केल्याची दिसून आले. सदरच्या रस्त्यावर अपेक्षेपेक्षा कमी डांबर वापरल्यामुळे हातानेही रस्ता उकरू लागला आहे. या रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अर्धा किलोमीटर परिसरात दहा ते बारा ठिकाणी छोटे-छोटे खड्डे पडलेले दिसून आले. या संदर्भात संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांनी पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. परंतु केवळ एक महिना होऊन तयार झालेला हा रस्ता पूर्ण काम झालेले असताना जर पहिल्याच पावसात अशा पद्धतीने उकरला जात असेल तर पूर्ण कार्यकाळात त्याची काय अवस्था होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...