फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात येत असलेल्या मांगली/किटाडी येथे बौद्ध विहारासमोरील सौदर्यीकरणाचे काम सवर्णीयांनी उखडून फेकत जातीवाचक शिवीगाळ केल्याने संपूर्ण गावातील बौध्द बांधवांनी पोलिस स्टेशनमध्ये धडक देत तक्रार दाखल दिली. गावात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
लाखनी तालुक्यातील मांगली/किटाडी येथे दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत बौद्धविहार सभागृह (सौदर्यीकरणाचे) काम ग्राम पंचायत यंत्रणेमार्फत सुरू होते. मात्र या दरम्यान गावातील उच्च वर्णीयांनी सुरू असलेल्या कामाबाबद पूर्वसूचना न देता, कामात अडथळा निर्माण केला. बौद्धविहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाची नासधूस केली. तसेच दलित बांधवाना जातीवाचक अश्लील शिवीगाळ करायला सुरूवात केली. यामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण केला. परिणामी दलित बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी दलित बांधवांनी गावातील 40 उच्च वर्णीय नागरीकांची पालांदुर पोलिसांत तक्रार दिली. असल्याने कायद्या सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर सध्या गावात तणावपूर्ण शांतता पसरली असुन पोलिसांनी गावात चौकशी सुरु केली आहे.