राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मिहीर देसाई यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. भाजपा प्रदेश कार्यालय वसंत स्मृती, दादर येथे हा कार्यक्रम पार पडला. युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर व प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण यांकडून मिहीर देसाई यांनी नियुक्ती पत्र स्वीकारले.
मिहीर देसाई हे 2015 ते 2019 या कालखंडात अभाविपचे काम करीत होते. त्यांनी अभाविप डोंबिवली शहरमंत्री, अभाविप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अशा जबाबदाऱ्या पार पडल्या. 2017 मध्ये सोची, रशिया येथे वर्ल्ड युथ फेस्टिव्हल येथे अभाविपकडून त्यांचा भारताचे प्रतिनिधित्व म्हणून सहभाग होता. 2019 विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मध्ये कॅबिनेटमंत्री रविंद्रजी चव्हाण ह्यांच्या प्रचार वेळेस चौक सभा प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली त्यानंतर ते भाजपा मध्ये सक्रिय झाले. मार्च 2020 मध्ये डोंबिवली पूर्व मंडल भाजयुमो अध्यक्ष त्यानंतर ऑगस्ट 2020 ते 2023 भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष अशी जबाबदारी होती.