मद्रे ता.दक्षिण सोलपूर येथील रहिवाशी सुभाष सोपान वाघमैतर यांचे चिरंजीव सिध्दार्थ आणि नांदनी ता. द.सोलापूर येथील रहिवाशी विठ्ठल सिद्धप्पा बनसोडे यांनी कन्या प्रतिमा यांचा मंगल परिणय सोहळा भारतीय संविधानाला साक्षी ठेऊन संपन्न झाला .भारतीय संविधानाची जागृती होण्यासाठी दोन्ही परिवाराने या संविधान दिनी विवाह सोहळा आयोजित केला. यावेळी उपस्थित नातेवाईक , मान्यवर, यांना उद्देश पत्रिकेचे वाटप करण्यात येऊन सुमारे हजारो जनसमुदाया समोर संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. यावेळी पाली भाषेचे अभ्यासक प्रा .घुमरे यांनी संविधानाचे महत्व सागितले ,तर जिल्हा काँग्रेस कमिठी चे उपाध्यक्ष सुरेश हसापुरे याकार्यक्रमाचे स्वागत करत वाघमैतर आणि बनसोडे परिवाराने समाजासमोर आदर्श ठेवला असे प्रतिपादन केले. यासोहळ्यास सूर्यभान गजभिये , सुरेश हसापुरे दादा कोरे , माजी जी प सदस्य आर.के. कांबळे साहेब ,मद्रे गावचे उपसरपंच मुजीब शेख, R P I (A) जिल्हा संघटक बाबासाहेब माने, जितेश वाघमारे, धर्मा माने, नरसिंग माने,मुकुंद माने,आशिष इंगळे,प्रमोद वाघमैतर, प्रकाश वाघमैतर, राना वाघमारे ,आनंद वाघमारे,अमोगसिद्ध वाघमारे, उपस्थित होते.
ही संकल्पना रमेश वाघमैतर,प्रशांत बनसोडे अमोल वाघमारे यांनी मांडली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...