राज्यातील बाजार समित्यांची २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यामध्ये नववा तर पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, यंदा आठ स्थानांची झेप घेत बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती थेट पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची यंदाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर केली. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्या आहेत. यामध्ये लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या बाजी मारली.