लद्दाखच्या माऊंट कूननजीक झालेल्या हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या सैन्याच्या 3 जवानांचा शोध सुरू आहे. याठिकाणी सोमवारी गिर्यारोहण प्रशिक्षणादरम्यान झालेल्या हिमस्खलनात एक जवान मृत्यूमुखी पडला होता. तर 3 जवान बेपत्ता झाले होते. या परिसरात सध्या बचावकार्य आणि शोध मोहिम सुरू असल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील कुन पर्वतावर सोमवारी भारतीय लष्कराच्या गिर्यारोहकांचा एक गट हिमस्खलनात अडकला. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (एचएडब्ल्यूएस) आणि लष्कराच्या आर्मी ऍडव्हेंचर विंगमधील सुमारे 40 जवानांची एक तुकडी माऊंट कुनजवळ गिर्यारोहण प्रशिक्षण घेत होती. मात्र, प्रशिक्षण चढाईदरम्यान लष्कराच्या तुकडीला हिमस्खलनाला सामोरे जावे लागले होते.