आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा मुस्लिम कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजातील मोठ्या नेत्यांशी संपर्क साधत आहे. तसेच राज्यातील काही प्रमुख मुस्लिम नेत्यांची दिल्लीत गोपनीय बैठक घेतल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या धोरणांमुळे मुस्लिम समाजातही विचार बदल आहे. मुस्लिम नेत्यांनाही वाटते की, राष्ट्रीय पातळीवर भाजपचा पर्याय काँग्रेसच होऊ शकतो. काँग्रेसची धोरणे अल्पसंख्यकांशी अनुकूल आहे. मुस्लिम समाजाच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठकांत भाजपच्या घेराबंदीसाठी उत्तर प्रदेशमध्ये व्यूहरचना आखण्यावर संमती झाली आहे. लोकसभेतील भाजपने सतत 2 वेळा प्राप्त केलेल्या बहुमतात उत्तर प्रदेशची मोठी भूमिका आहे. भाजपला उत्तरप्रदेशातून सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. अनेक मोठे नेते उत्तर प्रदेशमध्ये मुख्य विरोधी पक्षात असताना सपा मुस्लिमांचे मुद्दे व्यवस्थित उचलू शकले नाहीत.
उत्तर प्रदेशच्या 80 पैकी लोकसभेच्या 13 मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यात पश्चिम उत्तरप्रदेशच्या जागा आहेत. मुजफ्फरनगर, मथुरा आदी जागांवर जाट मतदार जास्त आहेत. येथे मुस्लिम जाटांसोबत विजयी समीकरण बनू शकते. उत्तप्रदेशात 2022 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 2.3 टक्के मतांसह 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. ही स्थिती आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पालटण्यासाठी काँग्रेस प्रयत्नरत आहे.