सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे मराठी लघुचित्र (शाॅर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वेग, वृद्धाश्रम, डेटिंग एप आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) हे विषय असणार आहेत.
या स्पर्धेसाठीचे नियम पाहता १८ ते २५ वर्षे आणि २५ वर्षांवरील, अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शाॅर्ट फिल्मची वेळ १० मिनिटांची असावी. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येणार आहे. दोन्ही गटांतील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका vinayaptepratishthan@gmail.com यावर ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवायच्या आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ७५० रुपये आहे. स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिरात तज्ञ भरत दाभोळकर, संकलक भक्ती मायाळू आणि सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे हे असणार आहेत. अधिक माहितीसाठी विहान आपटे यांना 9769331287 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.