शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने राहत्या गावी गळफास घेत आयुष्य संपवले आहे. ३४ वर्षीय सचिन मेटे याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विनायक मेटे यांचे भाऊ त्रिंबक मेटे यांचा सचिन हा मुलगा आहे. सचिनने टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच विनायक मेटे यांच्या निधनाला वर्ष पुर्ण झाले होते. दरम्यान सचिन याने केलल्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मागील वर्षी रस्ते अपघातात विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू झाला होता. विनायक मेटेंच्या मृत्यूच्या धक्क्यातून मेटे कुटुंबीय सावरत असतानाच सचिनच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.