मुंबई भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चाचे सुरेश पाल यांची केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय मुंबईच्या सल्लागार समितीत निवड झाली. श्री. पाल यांनी मुंबई भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चाच्या माध्यमातून मुंबईतील सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षापासून लढा दिला आहे. त्यांना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांचे मार्गदर्शन लाभले.