बजरंग दलच्या सोलापूरमधील गोरक्षकांनी सलग ४ दिवसात ४ कारवाई करीत ५८ गोवंशांना कत्तलीपासून दिले जीवनदान दिले. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सलग ४ दिवस कारवाई ४ कारवाई करीत ५८ गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंगी गोरक्षकांना यश आले आहे. दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक चौक सोलापूर येथे एक गो तस्करी आयशर वाहन क्र. MH ११ M ४७८९ पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत २१ देशी गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंग दलातील गोरक्षकांना यश आले आहे.
सदर कारवाई सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली. या घटनेत गोरक्षकांवर व पोलिसांवरही जीव घेणे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहन चालकावर व अन्य २ व्यक्तीवर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी बजरंग दलातील गोरक्षक हे अक्कलकोट रोड मार्गे जात असताना एक व्यक्ती सायकलवर गोमास विकत आहे अशी शंका आल्याने त्याची पाहणी केली असता एका पोत्यात गोमास निदर्शनास आले. हा गोमास घरोघरी जाऊन विकत असल्याचे व सदर गोमास गाईचे असल्याचे आरोपीने मान्य केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर व्यक्तीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.दि.१२ नोव्हेंबर २०२३ रोजी बजरंग दलातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टेंभुर्णी मार्गे कुर्डूवाडी येथून मोठ्या प्रमाणात गोवंशांची तस्करी होणार आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने एक पिकअप वाहन क्र. MH १२ EF ७५९८ हे वाहन ताब्यात घेऊन वाहनातील एकूण ३० गोवंशांना बजरंग दलातील गोरक्षकांनी कत्तलीपासून वाचविण्यात आले आहे.
सदर कारवाईतील सर्व जनावरे ही श्रीकृष्ण गोशाळा मोडनिंब येथे सोडण्यात आले आहेत.दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी बजरंग दलातील गोरक्षकांनी देगाव रोड येथे सापळा रचला असता पहाटे ५ दरम्यान एक संशयित टाटा सुमो ग्रँड जीएस या कंपनीचे वाहन क्र.MH १० AN ५८६८ हे वाहन संशयास्पद निदर्शनास आले. गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने गोरक्षकांवर घातपात च्या हेतूने हल्ला करायचा प्रयत्न केला पण गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे सदर वाहन हे देगाव तांडा येथे अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत गोरक्षकांनी सदर वाहनातील सात देशी गोवंशांना कत्तलीपासून जीवदान दिले आहे. वाहन चालकावर क्लीनर वर सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाया करण्याकरिता सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे विठ्ठल काळजे , मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल सोलापूर विभाग संयोजक सिद्राम चरकुपल्ली, बजरंग दल सोलापूर जिल्हा सहप्रमुख योगीराज जडगोणार, ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर पवनकुमार कोमटी,बजरंग दल सोलापूर गोरक्षा शहर प्रमुख अविनाश कैयावाले, गोरक्षक विनायक निकते, पवन बल्ला, कुमार आंबट तसेच आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले.