कै. हणमंत काळे यांच्या कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यासाठी व शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिक्षक भारती संघटनेच्या वतीने चालू केलेले आमरण उपोषण शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संघटनेच्या महत्वाच्या तीन मागण्या लगेच मान्य केल्या तसेच इतर प्रलंबित प्रश्न पंधरा दिवसाच्या कालावधीत निकाली काढू अशी हमी दिली. शिक्षक भारती संघटनेचे कार्यवाह प्रकाश शेळके यांच्याशी चर्चा करून आजचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.