जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, सोलापूर महापालिका एन एच एम संघटना व सोलापूर महापालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती यांच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम / जीएनएम / एलएचव्ही / प्रयोगशाळा तंत्रज्ञ / औषध निर्माण अधिकारी / वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचान्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत सेवेत कायम करणे व रिक्त पदावर समायोजन करणे अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना सोलापूर शाखेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सुनिता पवार नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेविकेचा जीव गेला त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून दहा लाखाची आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी ही मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस , वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सहा दिवसांपासून नर्सेसनी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. राज्यस्तरीय आंदोलनाला पाठिंबा दिला. पण दखल घेतली नसल्याने आजपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.