कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोलापुरात कांद्याला प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत.याचा मात्र, शेतकऱ्यांना फायदा होत असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.
सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रति किलो कांद्याला 40 ते 45 रुपयेपर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. मागच्या आठवड्यात सोलापुरात कांद्याला सरासरी 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर होता. आज मात्र भाव 40 ते 45 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. कांद्याला भाव मिळाला तरीही शेतकरी मात्र समाधानी नाहीत. कारण, कांद्याला चाळीस रुपये भाव मिळाला असला तरीही मागील आठ महिन्यांपासून चाळीत कांदा राहिल्याने त्याचे वजन घटले आहे. त्यामुळे कांद्याला प्रत्यक्ष 40 रुपये भाव मिळाला असला तरी कांद्याचे वजन घटल्याने आम्हाला फारसा फायदा नसल्याची माहिती कांदा उत्पदक शेतकऱ्यांनी दिली आहे.