औद्योगिक वसाहत वीज वितरण शाखा कार्यालय येथे चालक म्हणून कार्यरत असलेले जुल्फीकार अब्दुल रफिक शेख (वय-५७ रा.सिद्धेश्वर नगर, सोलापूर) यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी जुल्फेकार शेख हे औद्योगिक वसाहत वीज वितरण केंद्रात काम करत असताना वीज ग्राहक संजय कोल्हापूरे (रा.महाराणा प्रताप नगर,झोपडपट्टी सोलापूर) त्या ठिकाणी येवून लाईट केव्हा चालू करणार असल्याचे विचारणा केली. या कारणावरून तुम्हा लोकांना खूप मस्ती आली आहे, तुम्हाला दाखवतो असे म्हणून आरडाओरडा सुरु केली. रागाला जावून फिर्यादीच्या अंगावर धावून स्ट्रीट लाईटचे पाईप डोक्यात मारून जखमी केले. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कोल्हापुरे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदे हे अधिक तपास करत आहेत.