उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावचे नेते मोहिते पाटलांचे समर्थक असलेले भारत जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारत जाधव यांचा हा प्रवेश आजी माजी आमदरांना धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जाधव यांचा प्रवेश झाल्याने सुरेश हसापुरे यांचेही वजन वाढल्याचे शिंदे दरबारी दिसत आहे.
शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी झालेल्या प्रवेश कार्यक्रमात यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, सिद्राम सलवदे, विनोद भोसले, सुदर्शन आवतडे, गणेश डोंगरे, भारत कराळे, सचिन गुंड, संदीप सुरवसे, सतीश पाटील, संजय खरटमल, मिनाज पटेल, प्रवीण फुलसागर, सुखदेव थोरात, हारून पटेल, गोवर्धन गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारत जाधव यांचे स्वागत करताना सुशीलकुमार शिंदे यांनी उत्तर तालुक्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि काँग्रेस कायम तुमच्या सोबत राहील असा विश्वास दिला.
भारत जाधव यांनी प्रवेश करताच कोणत्याही पदाची अपेक्षा न करता उत्तर सोलापूर तालुक्याला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तालुक्यातील बुथ यंत्रणा सक्षम करण्याचा शब्द दिला.
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही भारत जाधव यांचे मनापासून स्वागत केले तसेच जिल्हा सरचिटणीस सिद्राम सलवदे यांनी आता उत्तर तालुक्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.