मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजानेही पाठिंबा दर्शविला.त्याचबरोबर उपोषणास बसणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ व उत्तर सोलापूरचे विद्यमान आमदार यशवंत मानेलाही गाव बंदी करा असे काका साठे व जितेंद्र साठे यांना केले आव्हान. मराठा आरक्षण संदर्भात चाललेल्या साखळी उपोषणची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बळीराम साठे यांच्या हस्ते करुन करण्यात आले. यावेळी साखळी उपोषणास गावचे सरपंच जितेंद्र साठे, तुषार साठे, मनोज साठे, हरिभाऊ घाडगे, विकास गाडे, जयदीप साठेआदी मराठा समाजासह इतर समाजाचेही बांधव उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...