सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलेल्या दिसत आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे विक्रीसाठी आणलेला कांद्याचे पोते पाण्यामध्ये भिजून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने विक्रीसाठी कांदा मोठ्या प्रमाणात आणला होता मात्र मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनावर टीका करताना जमिनीवर ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजला असून याची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल उपस्थित केला आहे. पावसाचे पाणी नेहमीच कांदा सेलहॉलमध्ये शिरत असल्याने दरवर्षी अशा मोठ्या प्रमाणात नुकसान होते याकडे बाजार समिती प्रशासन दुर्लक्ष करीत असून शेतकऱ्यांना याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी कांदा सर्वत्र फेकून दिल्याचे विदारक चित्र आहे तर दुसरीकडे आणलेला कांदा लोडिंग आणि अनलोडींग करण्यासाठी माथाडी कामगारांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आलेल्या ट्रक मधून कांदा उतरवणे तसेच ट्रकमध्ये कांदा लोड करणे जिकरीचे बनले असून सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढलेला आहे. एकंदरीत बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असल्याने रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...