सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, चंद्रकांत पाटील यांसह विविध नेत्यांचे फोटो या पुतळ्यावर लावण्यात आले होते.
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलचं पेटलं असल्याचं चित्र आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजही चांगलाच आक्रमक झालाय. तसेच आरक्षणासाठी तरुण सध्या आत्महत्या देखील करतायत. मागील काही दिवसांमध्ये आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. तरुणांनी आत्महत्या करु नये, गनिमी कावा पद्धतीने रस्त्यावर उतरुन लढा उभारावा असं आवाहन या मराठा आंदोलकांनी यावेळी केलं आहे.