राज्यातील 40 तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील 1021 मंडळामध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळले.त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये त्या महसूल मंडळांचा पण दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला .तेथेही आता सवलती लागू असतील. ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे, अशा १०२१ महसुली मंडळांमधील शेतक-यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...