टेंभू व म्हैसाळ योजनेच्या सांगोला तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा आजी-माजी आमदार आक्रमक झाले आहेत. नियोजनानुसार ‘टेल टू हेड’प्रमाणे हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराच आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीसाठी खासदार संजय पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.