पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी त्याच्या अंतिम भागासह परत येणार आहे. या सीरिजचे सर्व भाग ०३ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होतील.
या मालिकेत कर्नाटकातील खानापूर येथे जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगी या फळविक्रेत्याचे जीवन आणि १८ राज्यांमध्ये पसरलेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या भारतातील सर्वात कल्पक घोटाळ्यांपैकी एकाचा मास्टरमाइंड बनण्याचा त्याचा प्रवास दाखवला आहे. स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरीची निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटने स्टुडिओनेक्स्टच्या सहकार्याने केली आहे.
या मालिकेत गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसावेर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव यांच्या भूमिका आहेत. ही मालिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता या सीरिजचे शो रनर असून तुषार हिरानंदानी यांनी ती दिग्दर्शित केली आहे.