राज्यातील हिंगोली येथे आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. नागरिक पहाटेच्या साखर झोपेस असताना 5 वाजून 9 मिनिटांनी हे धक्के बसलेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज, सोमवारी पहाटे नागरीक साखर झोपेत असतांना अचानक जमिन हादरू लागली. काही काळ हे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील 10 ते 12 गावांत हे भूकंपाचे धक्के बसले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरीक घरातून बाहेर पळून आले. सुदैवाने कुठेही आर्थिक नुकसान वा जीवित हानी झालेली नाही.