हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रंचड पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच हवामान विभागाने या दोन्ही राज्यांना ‘रेड-अलर्ट’ जारी केलाय. त्यानुसार आज, गुरुवारी (17 ऑगस्ट रोजी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यांतील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दोन्ही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आज (17 ऑगस्ट) राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागानुसार राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. याशिवाय बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केलेय. यासोबतच राजधानीत दिल्लीत हलका पाऊस अपेक्षित आहे. तर, शुक्रवारी (18 ऑगस्ट) हवामान चांगले राहील. याशिवाय, दिल्लीतलं आज कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी दिल्लीत पाऊस पडल्यानंतर तापमान वाढण्याची शक्यता आहे.