महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कामामुळे उजनी हेड वर्क्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने गुरुवारी उजनी लाईनवरील काही भागातील पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस १३२ केव्ही कर्मयोगी साखर कारखाना ते १३२ केव्ही इंदापूर सबस्टेशन लाईन मेन्टेनन्स व तसेच इंस्युलेटर स्ट्रिंगीग कोल्ड वॉश करण्याकरीता दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १ ते ५ कालावधीकरीता शटडाऊन घेण्यात येणार आहे.त्यामुळे उजनी हेड वर्क्स येथील पंप हाऊसकरीता १३२ केव्ही इंदापूर सबस्टेशनहूनयेणारी ३३ केव्ही लाईन बंद राहणार आहे.या कामामुळे उजनी हेड वर्क्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजीचा उजनी लाईनवरील काही भागातील पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. शहरातील नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका सार्वजनिक अभियंता यांनी केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...