भोकरदन येथील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव जयंती समितीचे कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी राजाभाऊ देशमुख तर उपाध्यक्षपदी रोहित खिंवनसरा, सचिवपदी अमोल गायकवाड यांची निवड
भोकरदन : येथील शासकीय विश्रामगृहात मातंग समाज बांधवांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आढावा बैठक घेण्यात आली.
मातंग समाजाचे ज्येष्ठनेते भीमराव कामकर, भिकनराव गायकवाड, महिला नेत्या कांताबाई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली असून अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती २०२४ ची कार्यकारणी सर्वांच्या बिनविरोध निवड करण्यात आली. यात जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते रोहित खिंवनसरा आणि सचिव म्हणून अमोल गायकवाड यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी सदस्य म्हणून बाबुराव कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, जगदीश कामकर, जगदीश गायकवाड, दादाराव अंभोरे, संजय गायकवाड, नितीन गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, मुकेश वाघमारे, अनिल कांबळे, अर्जुन रामफळे, राजु पाजगे, प्रकाश कांबळे, अंकुश तुपे आदींची निवड करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह उर्वरित कार्यकारणीचा मातंग समाज बांधवांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान १ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ध्वजारोहण आणि अभिवादन कार्यक्रम होणार आहे. ११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी ७ वाजता पंचायत समिती प्रांगणात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका श्रीमती कडुबाई खरात यांचा समाज प्रबोधनपर भरदार गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.