धाराशिव :कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील २० ,९ ५८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात १०७१३ पुरुष, १०२४५ महिला मतदार आहेत. मतदानासाठी शहरात २४ ठिकानी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.
नामनिर्देशन दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर, छाननी १८ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत १९ ते २१ नोव्हेंबर, चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर, आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल
या निवडणुकीत १० प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण २० नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा ₹ ७ लाख ५० हजार, नगरसेवकपदासाठी ₹ २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. उमेदवारांनी दररोजचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल, तसेच सेतू सेवा केंद्रे आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सभा रेकॉर्डिंग करण्यासाठी व्ही .एस .टी . तीन पथक चेक पोस्ट साठी एफ . एस . टी .तीन पथक , धाड पथक एस . टी . टी . तीन पथक असे एकूण नऊ पथकाची निर्मिती या नगरपरिषद निवडणुकीसाठी करण्यात आलेली आहे . शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात फक्त दोन व्यक्तींना प्रवेश असेल. निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा गुरमे ,अजित काकडे यांनी नागरिकांना “लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि मतदानाचा हक्क बजवावा.” असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचे राण पेटले असून, कुरघोड्यांचे राजकारणाला आता उत आला आहे,महाविकास आघाडी बरोबरच आता महायुतीतही संभ्रमावस्था आहे,महायुतीतील मोठ्या भावाच्या भुमिकेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी यांचा अध्यक्षपदावर दावा आहे.
अध्यक्षपद महायुतीत भाजपा कडे दिल्याशिवाय इतर जागांवर चर्चा नको अशी भुमिका स्थानिक पदाधिकारी यांनी घेतली आहे,भारतीय जनता पार्टीचा मोठा मतदार वर्ग कळंब शहरात असुन,त्याला राणाजगजितसिंह पाटील यांचे भाजपात चांगलेच वजन असयेण्याने आता आणखीनच बळ मिळाले आहे,या प्रमुख कारणांमुळे भारतीय जनता पार्टी ही अध्यक्ष पदावरील आपला दावा सोडायला तयार दिसत नाही,असे सततच्या फेसबुक,वाॅटस् ॲपला प्रसिद्ध होणाऱ्या पोस्ट वरून दिसून येते



















