अक्कलकोट – तालुक्यातील श्री क्षेत्र बासलेगाव येथील श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना डॉ. श्री शिवाचार्यरत्न जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावाने, मंगलमय वातावरणात संपन्न झाली
. यावेळी श्री. ष.ब्र. बसवलिंग महास्वामीजी नागणसूर तुप्पीन मठ, श्री.ष.ब्र.मारुलाराध्य शिवाचार्य महास्वामीजी माशाळ, श्री.ष.ब्र. बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट, वे.पं. सोमनाथ स्वामी धोत्री हे उपस्थित होते. या श्री जगदंबा देवीचे मोठे महात्म्य आहे.*
दरम्यान श्री लक्ष्मी मंदिर येथून देवीच्या डोंगराकडे मूर्तीची भव्य मिरवणूक, रात्री भजन, जागरण व पारंपारिक ढोल वाद्यासह जागरण कार्यक्रम त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. डोंगरावरील श्री जगदंबा देवी मंदिर येथून गावातील प्रमुख मार्गावरून जलकुंभ घेऊन ३०० सुहासिनीसह श्री जगदंबा देवी मिरवणूक संपन्न झाली. भजन पारंपारिक ढोलवद्यासह जागरण असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या प्रसंगी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व साडेतीन शक्तीपीठ या अध्यात्मिक तीर्थस्थळाचे प्रवचन संपन्न झाले. जमखंडी येथील हलता देखावा हा लक्षवेधी ठरला. बंजारा समाजातील पारंपारिक वेशभूषासह बहुसंख्येने महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमास रेऊर जि. गुलबर्गा येथील माजी आमदार दत्ता तथा अप्पू गौडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीताई पाटील, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, भाजपा चे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी, नवी मुंबईचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मूर्तीची मुख्य प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अभिषेकसाठी गावातील विहीर ते देवीच्या मंदिरापर्यंत जलकुंभ व महाआरती संपन्न झाली. विविध धार्मिक कार्यक्रम श्री जगदंबा देवी ट्रस्टचे मुख्य पुजारी श्रीराम देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी बासलेगाव येथील नवी मुंबई वाशी मार्केट स्थित असलेले माथाडी कामगार आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. ग्रामस्थांबरोबर त्यांनी देखील श्री जगदंबा चरणी सेवा रुजू केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बासलेगावातील सर्व ग्रामस्थ व श्री जगदंबा देवी संस्थेचे विश्वस्त व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या विविध कार्यक्रमास तालुक्यातील श्री देवीचे भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
















