बार्शी – महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्शी येथील पुतळा पार्कमध्ये त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर वाघमारे, ऍड. अविनाश गायकवाड, ऍड. वृषाली वाघमारे, भालचंद्र राजगुरु उपस्थित होते.
भीम टायगर संघटनेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भगवंत रक्तपेढीच्या सहकार्याने पुतळा पार्क येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले यात १२५ जणांनी रक्तदान केले. यावेळी निलेश वाघमारे, राहुल बोकेफोडे, दलित महासंघाचे शहराध्यक्ष संदीप आलाट, विनोद कांबळे, प्रसन्न नाईकनवरे उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला बारबोले, विद्या बंगाळे, राणी शेळके, ऍड. शैला क्षीरसागर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
नगरपरिषदेच्यावतीने कर अधिकारी विठ्ठल पाटोळे, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेतील सर्व शाखेतील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यासमवेत शंकर वाघमारे, ऍड. वृषाली वाघमारे.





















