सार्वभौम सुवर्ण रोख्यांची नवीन मालिका आज, १८ डिसेंबर रोजी जारी करण्यात आली असून गुंतवणूकदार २२ डिसेंबरपर्यंत या मौल्यवान रोख्यांमध्ये गुंतवणूक करू
२०१५ मध्ये पहिल्यांदा जारी करण्यात आलेले सार्वभौम सुवर्ण रोखे (गोल्ड बाँड) सुरक्षित आणि हमी परताव्याचा लोकप्रिय पर्याय म्हणून उदयास आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून जारी केले जाणारे सुवर्ण रोखे योजनेला अनेक गोष्टी आकर्षक बनवतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीवर सुरक्षिततेची तसेच परताव्याची हमी मिळते. सार्वभौम सुवर्ण रोखे सरकार मान्य असल्याने आणि रिझर्व्ह बँकेने जारी केल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला कोणताही धोका नसल्याचे हमी मिळते.
सुवर्ण रोख्यांवर आयकर नियम
रिझर्व्ह बँक गोल्ड बाँड जारी करते ज्यांनी कमाईच्या बाबतीत गुंतवणूकदारांची निराशा केली नाही. या योजनेत बँक एफडी सारख्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा चांगला परतावा मिळतो तसेच गुंतवणुकीचे फायदे म्हणजे की सोन्याच्या वाढत्या किंमतीचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो आणि खरेदी केलेल्या सोन्यावर व्याजाही लाभ मिळतो. परंतु यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सरकार कसा कर वसूल करते, असा प्रश्न निर्माण होतो. सुवर्ण रोख्याच्या कमाईवर कर कसा मोजला जातो?
SGB व्याज उत्पन्न करपात्र आहे का?
सुवर्ण रोख्यांमधून मिळणार उत्पन्न पूर्णपणे करमुक्त नसते. आज आपण सार्वभौम गोल्ड बॉन्डच्या उत्पन्नावरील आयकराचे गणित समजून घेणार आहोत. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या गुंतवणूकदारांना २.५% दराने व्याजाचा लाभ मिळतो. सुवर्ण रोख्यांचे व्याज गुंतवणूकदारांच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि आयकर स्लॅबनुसार त्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. म्हणजे सार्वभौम गोल्ड बॉण्डचे व्याज उत्पन्न करपात्र आहे.
शॉर्ट/लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स
सार्वभौम सुवर्ण रोख्यांचे दुसरे उत्पन्न तेव्हा होते जेव्हा गुंतवणूकदार त्याचा कालावधी पूर्ण करतो. सार्वभौम गोल्ड बाँडची विक्री केल्यावर ग्राहकाला भांडवली नफा कर भरावा लागतो. होल्डिंग कालावधीवर अवलंबून म्हणजे तुम्ही किती काळ सुवर्ण रोखे तुमच्याकडे ठेवले आहे, त्यानुसार तुम्हाला कर भरावे लागते. एक वर्षापेक्षा कमी होल्डिंग कालावधीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो.
SGB वर कधी कर लागू होत नाही?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने मॅच्युरिटी पूर्ण होण्यापर्यंत सुवर्ण रोखे कायम ठेवले आणि ते विकले नाही तर मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारे उत्पन्न करमुक्त असेल, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर कर भरावा लागणार नाही. सर्वभौम सुवर्ण रोख्यांचा मॅच्युरिटी आठ वर्षांत असतो. म्हणजे गुंतवणूकदारांनी रोखे आठ वर्षे ठेवल्यास त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.