इस्लापूर – शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या वतीने खरेदी केंद्राची महाराष्ट्रभर स्थापना करण्यात आली. दिनांक 3 डिसेंबर रोजी इस्लापूर येथे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते हमीभाव खरेदी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या खरेदी केंद्रावर उडीद ,सोयाबीन,मुग, या मालाची शेतकऱ्याकडून खरेदी करण्यात येणार असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार या खरेदी साठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन कागदपत्रे नोंदणी करणे आवश्यक असून ही खरेदी गोकुळ कृष्णा ऍग्रो प्रॉडक्ट कंपनीच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती शिवम जन्नावार व सचिव प्रशांत श्रीमनवर यांनी दिली. याप्रसंगी प्रथम खरेदी ही इस्लापूर येथील अमोल राम लाभशेटवार यांची सोयाबीनची 41 किलो ची प्रथम खरेदी करण्यात आली.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार भीमराव केराम यांच्यासोबत नांदेड जिल्हा बँकेचे माजी. अध्यक्ष दिनकर दहिफळे, भाजपा दक्षिण तालुका अध्यक्ष सुर्यकांत आरडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हुरदुके ,माजी पंचायत समिती उपसभापती कपिल करेवाड, बालाजी आलेवार, तुकाराम बोनगीर, पत्रकार परमेश्वर पेशवे,काशिनाथ शिंदे, गंगाराम गडमवाड ,गौतम कांबळे,स्वप्निल गरडे , संतोष जाधव शिवनी,संदीप वानखेडे ,रवी कसबे , सत्येश्वर पेशवे, सुदर्शन पाटील, शिवशंकर मेळेगावकर, विकास माहुरकर, स्वीय सहाय्यक बंटी फड व भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्याची याप्रसंगी उपस्थिती होती.
याप्रसंगी इस्लापूर येथील व्यापारी दत्तात्रय पलीकौडंवार ,चंद्रकांत बीजमवार, नवीन मामीडवार, परिसरातील सदन शेतकरी परसराम फोले, दिगंबर करेवाड ,राजेंद्र पाटील घोगरे, प्रकाश करेवाड ,रमेश बोटेवाड, गोविंद भोयर,अनिल पाटील, देवानंद गिरी, यांच्या सह परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. सदरील हमी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना लाभ मिळावा व त्यांची लूट होऊ नये व व्यापारी मालामाल होऊ नये या बाबीची काळजी केंद्र चालकाने घ्यावी. या स्वरूपाच्या अपेक्षा या खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या गेल्या.


























