नांदेड / उमरी – राज्य व देश चालवणारे सरकार केवळ धर्म – जात यांचे कर्मकांड करून सत्ता उपभोगता आहेत परंमपरेपासुन वंचित बहुजनाला न्याय देण्याचे काम सरकार केले नसून आता शेतकरी जनतेच्या जिवावर उठल आहे समाज , हिंदूं धर्म मुस्लमान खतर मे है म्हणत दंगल घडवणारे सरकारच असून शेतकरी खतरे मै है महण्याची पाळी आली आहे असे उद्दगार प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी उमरी च्या जाहिर सभेत व्यक्तव्य केले आहे .
.
उमरी तालुक्यात जिल्हा परिषद तळेगाव गटात महिला मेळावा तर उमरी शहरात सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा झाली सभेलाही अलोट गर्दी ने गाजली .
यापुढे सुजात प्रकाश आंबेडकर म्हणाले सत्तेतले सरकार हे धर्मवेडेवर जात असून त्या मधिल सत्ताधारी हे सत्ता उपभोगण्यासाठी आहेत त्यांचा वंचित लोकाचे बहुतनाचे व शेतकरी यांचे कांही देण घेण नाही पण सत्तेत कोणतेही सरकार अस्तीतवात असुद्या वंचित बहुनज – शेतकरी यांच्या साठी लढा चालूच राहील.
आंबेडकर घराणे हे समाज चळवळीचे घराणे आहे लोकाच्या न्याय हक्का साठी लढणारे आहे
देशात सरकार सत्ता कोणाची ही असो जनतेला न्याय देण्याचे काम हे नेहमी आंबेडकर चळवळ करू शकते .
सतेत मंत्री आमदार खासदार नसले तरी वंचित बहुजनाला न्याय देणारा पक्ष आहे जाती समाज – धर्मकांड विरोद्धी बुलंद आवाज पुकारनारा समाज हिताचा व मानवतेचा पक्ष आहे . संविधान व आरक्षण यांच्या विषयी राजकीय तेड निर्माण करून सत्ता हस्तगत करीत असल्याचा अरोप सुजात आंबेडकर यांनी करीत सरकार ने धर्माला नाही तर शेतकरी यांना जि एस टी . इतर टॅक्स चे कर लादून संकटांत टाकून आहे त्यामुळे वंचित बहुजन पक्ष संघटनेने एकत्रीत येवून सामाजीक राजकीय लढा लढवणे गरजेचे आहे असे ही आंबेडकर
म्हणाले आहे.
हिंदू असो मुस्लीम कोणत्याही धर्माची महिला – भगीनी असो तिला सबलीकरण करण्यासाठी कोणत्याही माध्यमातून पाटिबां द्यावे विशेषता तळेगाव गटातून करूणा खंडेलोटे यांचे नाव घोषीत केले आहे .
उमरी जाहिर सभा आयोजक – संदेश गायकवाड सिंधीकर यांनी केली असुन त्यांचा ही नावाची राजकीय जोरदार चर्चा होत आहे या वेळी जिल्हा व तालुका स्तर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन गंगाधर लांडगे राहाटीकर यांनी केले आहे विशेष म्हणजे निवडणूक तोंडावर आल्याने आंबेडकर चळवळी चे नेते ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .




















