नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार झाली. मीनाक्षी शिवराम झुगरे असे या तरुणीचे नाव आहे. निशाणवाडी (त्रिंगलवाडी) परिसरात आज, मंगळवारी पहाटेच्या ही तरुणी बाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी बाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ह्या भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व भागात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मथुरा भगत यांनी केली आहे. दरम्यान वन विभागाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्याची दहशत कायमच आहे अवघ्या तीन दिवसांपूर्वी याच इगतपुरी तालुक्यामध्ये लपून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून आपल्या मित्रांना वाचवण्याची घटना घडली होती तर त्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी च्या दिवशी रात्री सिन्नर तालुक्यात तीन बिबट्यांनी एका कुत्र्याचा फडशापडल्याची घटना घडली होती. नाशिक शहर आणि परिसराच्या लगतही बिबट्याचा वावर हा सातत्याने आहे अगदी दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी नाशिक रोड जवळील कोटमगाव येथे आदल्या दिवशी गस्त घालणारा आणि कुत्र्याची शिकार करणाऱ्या बिबट्याला लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले सातत्याने बिबट्याची दहशत नाशिक शहरातील इतर परिसरासह सिन्नर इगतपुरी दिंडोरी निफाड या परिसरामध्ये नागरिकांमध्ये बसली आहे.