कुर्डूवाडी – कुर्डूवाडी नगरपरिषद द्वारे टेंभूर्णी रोड वरती बेंद ओढ्यावर चालु असलेले निकृष्ठ दर्जाच्या पुलाच्या कामाचे पालीका सभाग्रहात सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रीतपणे विरोध दर्शवून देखील न जूमानता प्रशासनाने चालूच ठेवल्याने नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे. विशेश म्हणजे जवळपास एक कोटी रूपये म्हणजे पन्नास ट्क्के बिलही ठेकेदाराला देण्यात आले आहे. वास्तवीक हा पुल पुर्णपणे दोन कोटीचा नसून पन्नास लाखाचाच असल्यासारखा बादण्यात आला असल्याचे दीसुन येते.
@ दोन कोटी रूपये अंदाजपत्रकीय रक्कम असून अक्षय बागल एजन्सी यांच्याकडे ते काम आहे. बेंद ओढ्यावरती सुमारे दोन कोटी रूपयाचा चालु असलेल्या पुलासाठी सभाग्रहात काही महीला नगरसेविकांनी इस्टीमेट नुसार काम होत नसून त्यामध्ये नियमानुर स्टीलचा वापर होत नसल्याच्या तक्रारी लेखी स्वरूपात देवून सभाग्रहात प्रश्न उपस्थीत केले होते.यावर प्रशासनाने चौकशी करून बदल करण्यात येइल असे सांगून वेळ मारून नेली मात्र यावर कोणतीही कारवाई न करता काम चालुच राहीले. विशेष म्हणजे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,मुख्याधिकारी यांच्यासह एकाही नगरसेवकांना ठेकेदाराने न जूमानता काम चालुच ठेवले व पुलावरती स्लँपदेखील टाकुन मोकळे झाले.
@ वास्तवीक पाहता या पुलाची उंची व रूंदी पाण्याच्या प्रवाहाप्रवाहा प्रमाने नसून त्यामध्ये भविष्यात अडचणी उद्भवण्याची दाट शक्यता आहे.ज्या पध्दतीने पुलाचे काम दीसुन येते आहे ते पहाता ते कुठेही दोन कोटीचा वाटत नसून पन्नास लाखाचेच काम आहे की काय असा या ठीकाणी प्रश्न उपस्थीत होतो आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवरून चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता पुढे आली आहे.
Post Views: 35