सध्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीदारांची लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या.
आज मंगळवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत 6327 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5800 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज सोन्याचा दर स्थिर असला तरी चांदी मात्र महागली आहे.
आज सोने-चांदीचा दर काय? :
आज 30 जानेवारी 2024 रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्यासाठी 63,050 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,800 रुपये होती, तर 18 कॅरेट सोन्याची 47,290 रुपये प्रतितोळा आहे.
चांदी महागली :
👉🏻 आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत 300 रुपयांची वाढ झाली असून आज चांदीचा दर 76,500 रुपये प्रतिकिलो आहे.