हिंगोली – राष्ट्रसेविका समिती देवगिरी प्रांत यांच्यावतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या 169 व्या जयंतीनिमित्त महिलांची मनकर्णिका पायी चालणे स्पर्धा दिनांक 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये 125 महिलांनी सहभाग घेतला होता येथील सिटी क्लब शिवाजीनगर येथून या स्पर्धेला सुरुवात झाली देवगिरी प्रांतचे रमेश जाधव प्राध्यापक आनंद भट श्रुती देशपांडे यांनी या स्पर्धेला हिरवी झेंडे दाखवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महावीर चौक गांधी चौक या मार्गाने स्पर्धकांनी तीन किलोमीटर अंतर चालत ही स्पर्धा पार पाडली यामध्ये 18 ते 35 वयोगटातील महिला तसेच 35 वयोगटा पुढील महिला अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3100 द्वितीय 2100 तर तृतीय अकराशे रुपये प्रदान करण्यात आले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विभावरी डुबेवार रश्मी जोशी दिपाली धाडवे, दिपाली धाडवे मीनाक्षी शिंदे वर्षा देशमुख रीना जवळ रेणुका बंगाले निकिता झडपे सविता बोराळकर सोनल भरतिया सुमन दुबे अश्विनी बासटवार दीपिका यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
























